Politics News । लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी तासगाव येथील आर.आर.पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का, माजी गृहमंत्र्यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा
आमदार सुमनताईंनंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी उभे राहा, रोहितला बळ द्या, सर्व प्रश्न सोडवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. रोहित पाटील यांचा वाढदिवस असल्याने ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आता शरद पवार यांनी उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Ashok Chavan । भाजपमध्ये येण्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
‘जनतेने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली’
भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काही लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांना महाराष्ट्रात सत्तेवरून हटवायचे असेल तर जनतेला सोबत घेतले पाहिजे. आम्ही दहापैकी आठ जिंकलो, असे सांगून शरद पवार म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या नीलेश लंके यांना आम्ही संधी दिली आणि आता ते लोकसभेत बसले आहेत.
Ajit Pawar । मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा अजेंडा निश्चित!