Politics News । ब्रेकिंग! महिलांच्या खात्यात १ तारखेला तीन हजार रुपये येणार? बड्या नेत्याची घोषणा

Ladki Bahin Yojna

नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाठी ‘महालक्ष्मी योजना’ची घोषणा केली असून, यानुसार महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत. राहुल गांधींनी सांगितले की, महिलांना हे 3000 रुपये सकाळी उठल्यावर त्यांच्या खात्यात दिसतील. तसेच, महिलांना सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी मोफत तिकीट उपलब्ध करणार असल्याची माहिती दिली.

Rohit Pawar । “…त्यांनी आमचं घर फोडले” , रोहित पवारांचे धक्कादायक वक्तव्य

राहुल गांधी यांनी या सभेत भारत सरकारमधील आदिवासींच्या कमी प्रतिनिधित्वावरही आवाज उठवला. त्याने म्हटले की, भारत सरकारमध्ये 90 अधिकारी काम करत आहेत, परंतु त्यामध्ये फक्त एक आदिवासी अधिकारी आहे. तेही निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. आदिवासी समाजाला राज्य आणि केंद्र सरकारमध्ये न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार, आदिवासी अधिकारीांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी; राजकीय वर्तुळात खळबळ

याशिवाय, राहुल गांधींनी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी देण्याचा वादा केला आणि आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेची रद्द करण्याची घोषणा केली. बेरोजगारांना 4000 रुपये महिन्याला देण्यात येतील, तसेच अडीच लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. आरोग्य सेवेसाठी राज्यात 25 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा देण्याचाही त्यांनी वादा केला. यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे, आणि राज्यातील निवडणुकीच्या वाऱ्यात हा मुद्दा चर्चेत आला आहे.

Nawab Malik । आताच्या घडीची मोठी बातमी! मतदानापूर्वीच नवाब मलिक तुरुंगात जाणार? समोर आली मोठी अपडेट.

Spread the love