Politics News । माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला. “सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. तुम्ही चार वेळा खासदार झाल्या, मात्र चौथ्या वेळेस आमचा अदृश्य सहभाग होता,” असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, कारण भाजपमध्ये राहून त्यांनी सुळे यांना मदत केल्याचे उघड झाले आहे.
Bjp । भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात केला प्रवेश
पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी द्या, ती पार पडेल,” असे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे. मी जनतेचं ऐकलं.”
भाजपला सोडण्याआधी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. फडणवीसांनी काही पर्याय दिले, पण पाटील म्हणाले की, “जनता त्याच्या पलिकडे गेलीय.” त्यांनी आपल्या मतदारसंघात झालेल्या अन्यायावर चिंता व्यक्त केली आणि त्यातून हा निर्णय घेतल्याचे सांगितले.