Politics News । महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजपच्या ‘एकाच कुटुंबातील एकालाच उमेदवारी’ धोरणामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Shrigonda News । भाजपला मोठा धक्का बसणार? श्रीगोंदा मतदारसंघात मोठ्या घडामोडी
विशेष म्हणजे गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे, परंतु संदीप नाईक यांना तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे शरद पवार गटाशी त्यांचा संपर्क असल्याची चर्चा सुरु होती. यानंतर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाईक यांनी शरद पवार गटात अधिकृतपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवारांनी 16 नेत्यांना दिले एबी फॉर्म; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?
संदीप नाईक यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यास एकाच कुटुंबातील दोन पक्षांचे उमेदवार असण्याचे अनोखे चित्र उभे राहणार आहे. गणेश नाईक यांचे नवी मुंबई महापालिकेत चांगले वर्चस्व आहे, ज्यामुळे त्यांच्या विचारधारेतील अनेक नगरसेवक याआधी निवडून आले आहेत. संदीप नाईक यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यास, हे कुटुंबीय भाजपच्या विरोधात ठाम उभे राहतील, हे निश्चित आहे.
गणेश नाईक यांनी भाजपमध्ये दोन जागा मागितल्याची माहिती होती, परंतु त्यांची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे संदीप नाईक यांच्या शरद पवार गटात प्रवेशामुळे भाजपच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.