Site icon e लोकहित | Marathi News

Politics News । “अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न”, बड्या नेत्याच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

Cabinet metting

Politics News । जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा खात्याची मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे पाठवलेली फाईल दहा वेळा परत आलेली असल्याचा आरोप करत मंत्री पाटील यांनी अर्थ खात्याच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. ‘अर्थ खात हे सर्वात नालायक खातं आहे. दहा वेळा मी पाठवलेली फाईल परत येत होती, मात्र मी पाठपुरावा सोडला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Ganpati Bappa Morya । गणेश चतुर्थीच्या उत्सवात गणरायाचे घराघरांत दणक्यात स्वागत!

या विधानावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, “अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणे हे अत्यंत धक्कादायक आहे. शिंदे गटाचे अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.” जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर शिंदे गटाच्या आरोपांना उत्तर दिले, तसेच लाडकी बहीण योजनेवरून सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये जाहिरात स्पर्धा सुरू असल्याची टिप्पणी केली.

Ajit Pawar । अजित पवार गटाला किती जागा हव्यात? छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला

पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, “नवीन सरकार येणार आहे, जे लोकांच्या मनाशी जुळवून घेतलेले असेल. नोव्हेंबर महिन्यात सत्तेवर येणारे सरकार लोकांच्या अपेक्षांचे असेल.” त्यांनी सांगितले की, “पार्टीत येण्यासाठी इच्छुक असलेले अनेक लोक आहेत, पण लाडकी बहिणीची स्थिती अनिश्चित आहे.” या विधानाने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Devendr Fadanvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “अजितदादांसोबतची युती नॅचरल नाही”

Spread the love
Exit mobile version