Site icon e लोकहित | Marathi News

Politics News । राजकीय घडामोडींना वेग! राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्वाची बैठक

Raj Thackeray Meet Eknath Shinde

Politics News । मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीमधील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसेवर जोरदार टीका केली होती. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । “…तर राजकारण सोडेन”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली आहे.

Jitendra Awhad । मुंबईत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, आमदार राजू पाटील, वैभव खेडकर, अजित अभ्यंकर, अभिजीत पानसरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Swapnil Kusale Wins Bronze । पट्ठ्यानं जग जिंकल! स्वप्नील कुसळेला नेमबाजीत कांस्यपदक

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी उरण या ठिकाणी यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चा केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Yashshree Murder Case । मी संकटात आहे, मला दाऊदपासून वाचवा… हत्येपूर्वी यशश्रीने कोणाला फोन केला होता? धक्कादायक माहिती समोर

Spread the love
Exit mobile version