Politics News । राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (NCP founder Sharad Pawar) यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘सुपारी’ दिल्याचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील अनिल देशमुख (Anil Deshmukh) गुरुवारी वर्धा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Politics News)
Virat Kohli । विराट कोहलीबद्दल धक्कादायक बातमी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
जुलैमध्ये, अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले, ज्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील भाषणानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत पक्ष सोडून गेलेले लोक घाईघाईने सरकारमध्ये सहभागी झाले होते, हे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला माहीत आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी मोदींनी पक्षावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेचा संदर्भ देत देशमुख म्हणाले, “ अजित पवार यांनी वेगळा मार्ग का स्वीकारला हे तुम्हाला माहीत आहे का? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेकथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला त्यांना सामोरे जावे लागले असते ते नको होते. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत गेले असे देशमुख म्हणाले आहेत.
त्याचबरोअबर पुढे ते म्हणाले, “शरद पवारांना राजकारणातून कस घरी बसवायचं अश्या पद्धतीच्या राजकारणाची भाजपाकडून अजित पवार गटाला सुपारी मिळाली आहे, आणि तश्या पद्धतीने ते काम करत आहेत..” असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.