Politics News । सातारच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी

udynraje bhosle

Politics News । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. साताऱ्याच्या राजकारणाविषयी पाहिले तर साताऱ्यात अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने जागा जाहीर केली नाही. महायुतीत साताऱ्याची जागा भाजप तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे ही जागा आहे. त्यामुळे या जागेवर कोण निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

Topers Ad

Raigad Lok Sabha । खासदार सुनील तटकरेंना धक्का; रायगड लोकसभेवर भाजपचा दावा

साताऱ्या मधून महायुतीतून उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे साताऱ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. यामुळे या जागेवरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरोधात पृथ्वीबाबा अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का

शरद पवार काढणार हुकमाचा एक्का ?

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात नसताना देखील त्यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. सातारा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे दावे-प्रति दावे सुरू आहेत. इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र या सर्व घडामोडीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता खरंच शरद पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Shocking News । धक्कादायक बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love