Politics News । सर्वात मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर शरद पवार गटात जाणार? पुन्हा मोठा राजकीय भूकंप

Politics News

Politics News । सध्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Car accident । भीषण अपघात! भरधाव कार झाडावर आदळली, ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

जर हे दोन्ही बडे नेते शरद पवार गटात गेले तर शरद पवार गटाकडून रामराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एका नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. भाजपने माढा लोकसभेसाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा विरोध होता.

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटील लढवणार विधानसभेची निवडणूक

हे दोन्ही नेते नाराज असल्याने भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र भाजप पक्षासाठी जे अनपेक्षित होतं तेच घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता हे डॅमेज कंट्रोल करणं भाजपला शक्य आहे का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत काँग्रेसमधून धक्कादायक बातमी समोर!

Spread the love