Politics News । शरद पवारांच्या घरी पवार-ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास चर्चा; समोर आली महत्त्वाची माहिती

Politics News

Politics News । मुंबई : मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सिल्व्हर ओकवर गेले असून त्यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होते.

Manoj Jarange Patil | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता, मात्र…

संजय राऊत, जयंत पाटील, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या चारही बड्या नेत्यांमध्ये काही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या चारही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास खलबतं झाली. यावेळी नेमकी काय काय चर्चा झाली या विषयाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (uddhav thackeray and sanjay raut meet ncp chief sharad pawar at his silver oak bungalow)

Viral Video On Social Media । गर्लफ्रेंडसमोर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, क्षणात घडलं भलतंच; पाहा Video

या बैठकी नंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी काँग्रेस सोबत चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात जागावाटप चर्चा करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात त्याचबरोबर अशोक चव्हाण हे सर्व नेते एकत्र बसतील अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Entertainment News । धर्मेंद्रची बिघडली तब्येत? अभिनेता सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना, अखेर खरं कारण समोर

संजय राऊत काय म्हणाले?

या बैठकीनंतर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “इंडिया आघाडीच्या समन्वयक मितीची उद्या महत्त्वाची बैठक असून. या बैठकी १३ नेत्यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक निर्णय होणार आहेत असं संजय राऊत म्हणाले आहे.

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट! म्हणाले; “एकनाथ शिंदे लबाड…”

Spread the love