Politics News । सध्या सोलापूरच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असुन चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे यांनी आज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोलापूरच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
अमोल कोल्हे यांनी मोहिते-पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर जयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. मागच्या काही दिवसापासून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता ते शरद पवार यांच्या साथीने लोकसभा निवडणूक लढवणार का? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “राष्ट्रवादी शरद पवार गटाची लवकरच लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर होणार आहे. यामध्ये आपली ट अँड वॉचची भूमिका आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील असा विश्वास देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.