Politics News । महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी आपल्या पक्षाला यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ८०-९० जागा द्याव्यात, अशी मागणी केली. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष असून अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे.
Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी
राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जेव्हा आम्ही युतीमध्ये (भाजप-शिवसेना) सामील झालो तेव्हा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला 80 ते 90 जागा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत आम्हाला फार कमी जागा मिळाल्या.
निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला जास्त जागा हव्या आहेत- भुजबळ
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “आम्ही त्यांना (भाजपला) सांगायला हवे की, निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला अधिक जागा हव्या आहेत, जेणेकरून आम्ही जवळपास 50 ते 60 जागा जिंकू शकू.” 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 जागांपैकी भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या, तर अविभाजित राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या होत्या. असं ते म्हणाले.