Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकारणात भूकंप?

Eknath Shinde

Politics News । राज्याच्या राजकारणात मागच्या अनेक दिवसापासून मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. दरम्यान सध्या देखील राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलीनीकरणाची भाजपाकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. साम टिव्हीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! गटातील नेत्यावर पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा

जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर भाजप हा प्लॅन तयार ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची समोर आली आहे.

Chandrakant Patil । धक्कादायक! चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, नेमकं प्रकरण काय?

जर शिंदे गटाचे आमदार अपत्र ठरवले किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील. अशी रणनीती भाजपचे आखल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरविरुद्ध तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

Spread the love