Onion: दिवाळीपर्यंत कांदा दरवाढीची शक्यता, महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणीला परराज्यातून वाढ

Possibility of onion price hike till Diwali, increase in demand of onion from Maharashtra from abroad

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी असते. तसेच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात कांद्याची लागवड (Cultivation of Onion) चांगली होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे कर्नाटकात (Karnataka) काढणीस आलेल्या नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे पीक नोव्हेंबपर्यंत येण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलोदरम्यान आहेत.

Maize Crop: मक्याचे दर टिकून राहतील? पाहुयात नेमकी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

ऑक्टोबर महिन्यात (month of October) कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन दसरा दिवाळीत बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ५० ट्रक कांद्याची आवक पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, जामखेड, संगमनेतर या भागांमधून होत आहे. दरम्यान सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ८० ते १३० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी कांद्याला सप्टेंबर महिन्यातच घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १८० ते २०० रुपये दर मिळाले होते असे पोमण यांनी नमूद केले.

Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

कांदा निर्यातीत घट

सध्या महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यातून घट झाली आहे. सध्या अतिवृष्टी आणि थंड वातावरणामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वखारीत साठवणूक केलेला कांदा शेतकरी सध्या मोठय़ा प्रमाणावर विक्रीस पाठवत आहेत. तसेच बांगलादेश आणि आखाती देशात होणारी कांद्याची निर्यात कमी प्रमाणावर होत आहे.

VIDEO: विराट-हार्दिकच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *