मुंबई: राज्यात आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास ( Winter session 2022) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काल राज्यमंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये काही मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तीचा कायदा लागू करण्याबाबत पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलगा पत्ते खेळताना सापडला वडिलांना अन् वडिलांनी बेदम मारला; पाहा VIDEO
विरोधक राज्यसरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहेत. सीमाप्रश्न,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राष्ट्रपुरुषांच्या अवमान, विकासकामांवरील स्थगिती इत्यादी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
मतदानासाठी थेट दुबईमधून बारामतीत आली ‘ही’ जोडी; गावाला चांगला सरपंच मिळावा म्हणून पार पाडले कर्तव्य
दरम्यान, “नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. ज्याप्रकारे केंद्रात लोकपालाचं विधेयक झालं त्याच प्रकारे महाराष्ट्रात लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे. अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hajare) सातत्याने करत होते. यावर आता शिंदे-फडणवीस सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत.” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.