Ajit Pawar । लोकसभेच्या (Loksabha election) तोंडावर मागील काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार करणार एक दोन दिवसांत साताऱ्यातील उमेदवाराबाबत घोषणा
अजित पवार गटातील नेत्याने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सातारा दौऱ्यावर असताना शरद पवार यांची आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रभाकर घार्गे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
दरम्यान, सातारा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी माघार घेतली आहे. शिवाय त्यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध देखील केला होता. अशातच या मतदारसंघातून स्वतः शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Satara Politics News । शरद पवार गटात मोठी खळबळ; या खासदाराने निवडणूक लढण्यास दिला नकार