Prabhas । दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या देखील तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्याचं कारण असं की प्रभास याचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. फेसबुक पेज हॅक झाल्यानंतर प्रभास याने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
गुरुवारी त्याचं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती अभिनेत्याने दिली आहे. त्याचबरोबर हॅकर्सने त्याचे फेसबुक पेज हॅक करून त्याच्यावर दोन व्हिडिओ देखील अपलोड केले आहेत ज्यामुळे सगळीकडे चर्चा चालू झाले आहेत. “अनलकी ह्यूमन” आणि “बॉल फेल्स अराउन्ड द वर्ल्ड” असे कॅप्शन देवून अभिनेत्याच्या फेसबूक पेजवरुन हॅकर्सने दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
अभिनेत्याने याबाबत ट्विट केले की, ‘माझ्या फेसबूक पेजसोबत ‘कॉम्प्रोमाइज्ड’ करण्यात आलं आहे.. टीम यावर काम करत आहे…’ सध्या हे ट्विट खूप व्हायरल झाले आहे. या हॅकिंगची माहिती मिळताच अभिनेत्याच्या टीमने लगेचच कारवाई सुरू केली असून अधिकृत पेज परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत दरम्यान, प्रभासच्या फेसबुक पेजवर 24 मिलियन हून अधिक फॉलोवर्स असून तो फक्त आणि फक्त एसएस राजामौली यांनी फॉलो करतो..