केंद्र आणि राज्य सरकार देशातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवतात. दरम्यान केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेने महागाई आणि कोरोना महामारीच्या (Corona) काळात (PMGKAY) लोकांना मोठा दिलासा दिला आहे. ही योजना केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सुरू केली होती.
Raj Kundra: “…त्यांनी तोंड बंद ठेवावं”,पॉर्नोग्राफी प्रकरणातील राज कुंद्राची पोस्ट चर्चेत
देशातील 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. ही योजना (Yojana) सरकारने मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू केली होती. या योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून केंद्र सरकार (Central Government) प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ मोफत देत आहे. दरम्यान ही योजना 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार आहे.
Aditya Thackeray: तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
परंतु या संदर्भात माहिती देताना अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढे नेण्याचा विचार करत आहे. मात्र, हा निर्णय सरकार कधी घेऊ शकते, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. अन्न सचिव सुधांशू पांडे रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वार्षिक बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेबाबत बोलताना म्हणाले की हा एक मोठा सरकारी निर्णय आहे. ज्यावर अंतिम निर्णय पंतप्रधान मोदींना घ्यायचा आहे.
Pune: उद्यापासून पुण्यातील ‘ही’ बँक होणार कायमची बंद, कारण…
अशी करा तक्रार
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत रेशन दुकानावर मोफत रेशन मिळण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल (NFSA) च्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. प्रत्येक राज्य सरकार रेशनच्या समस्येसाठी टोल फ्री क्रमांक जारी करते. याद्वारे, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in वर क्लिक करून तक्रार नोंदवू शकता.