Praful Patel । मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पाडली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. अशातच आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक मोठं विधान केले आहे. (Latest marathi news)
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “शरद पवार हे भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होण्यासाठी 50 टक्के सहमत होते. आम्ही 15 आणि 16 जुलैला शरद पवारांना भाजपसोबत जाण्याबाबत विनंती केली होती. पुण्यात उद्योगपतीच्या घरी दादा-पवार भेटही झाली होती, असा खळबळजनक दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भयानक अपघात, १ जण जागीच ठार तर ३ जखमी
“अजित पवार आणि आमच्या इतर मंत्र्यांनी 2 जुलैला सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्ही दोनवेळा शरद पवार यांना आमच्यासोबत सत्तेत येण्यासाठी विनंती केली होती. इतकेच नाही तर आम्ही शरद पवार यांच्या पायाही पडलो होतो. आता जे झालं ते झालं. तुम्ही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला नाही. पण आमची विनंती आहे की, तुम्ही या,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.