Site icon e लोकहित | Marathi News

प्रफुल्ल पटेल यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘शिंदे गुवाहाटीत असताना राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी…

Prafful Patel

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना-भाजपसोबत (BJP) युती करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीत गेले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 54 पैकी 51 आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे पत्र देऊन भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्याकडे पवारांनी लक्ष दिले नाही, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde । मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…

ज्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले होते त्यावेळी सत्तेत जाण्याची चांगली संधी राष्ट्रवादीकडे (NCP) होती. याच पार्शवभूमीवर पक्षातील आमदारांनी भाजपशी युती करण्याचा आग्रह शरद पवार यांच्याकडे केला होता. मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने एकनाथ शिंदे यांनी संधी साधून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले, असे पटेल यांनी म्हटलं आहे.

बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीला मोठा धक्का, अमोल कोल्हे देणार शरद पवारांकडे खासदारकीचा राजीनामा

दरम्यान, अजित पवारांचे बंड आणि शरद पवार यांची भूमिका यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शरद पवारांचे अत्यंत जवळचे असणारे प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या सोबत उपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवारांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालंय, एकनाथ शिंदे यांच वक्तव्य

हे ही पहा

Spread the love
Exit mobile version