आख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajkta Mali) होय. प्राजक्ता एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. मराठी मालिका ( series) आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी प्राजक्ता माळी रानबाजार या वेबसिरीजमध्ये झळकली होती.
वेबसीरिजदरम्यान प्राजक्ता गुटखा खायची, असं अनेकदा बोललं जायचं. नुकतंच आता याबाबत प्राजक्ता माळीने भाष्य केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमामध्ये प्राजक्ताला विचारण्यात आले रानबाजार वेबसिरीजमध्ये तू गुटखा खायची का? यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली. “त्यावेळी मी गुटखा नाही तर बडीशेप खायचे. त्या पॅकेटमध्ये बडीशेप असायची. त्याचं पॅकेजिंग सारखंच असायचं. मात्र त्याच्या आत असलेला माल वेगळा असायचा.” असं यावेळी प्राजक्ता म्हणाली.
कसबा, चिंचवडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस; शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात
दरम्यान, रानबाजार ही सीरिज सुपरहिट ठरली होती. यामध्ये प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका होती. यामध्ये प्राजक्ताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. गेल्या २० मे रोजी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली.