मुंबई : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajkta mali) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या स्टाईल आणि लूक मुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्री प्राजक्ता सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती व्यक्त होताना दिसते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtra hi hasyjatra) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता माळी करत होती. दरम्यान या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक(breack) घेतला होता. पण आता पुन्हा नव्या जोमाने हा कार्यक्रम सुरु झाला आहे.
Ajit Pawar: “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, अजित पवार संतापले
पण आता प्राजक्ता एका अभिनेत्याबरोबर परदेश दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आहे. परदेशात देवदर्शन करतानाचे काही फोटो देखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. तसेच संकर्षणबरोबर सेल्फी शेअर करत तिने म्हटलं की, “माझ्या मित्रासह लंडनला जाण्यासाठी तयार.” या फोटोमध्ये संकर्षणसह प्राजक्ता फारच खूश दिसत आहे. तसेच काही दिवस प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसणार नसल्याची शक्यता आहे.
Maheep Kapoor: “लग्नानंतरही संजय कपूरने…”, महीप कपूरचा खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा!
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा ‘वाय’ चित्रपट प्रदर्शित झाला. मग आता लंडनला ती नक्की कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. प्राजक्ता माळीने आजवर काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच तिची ‘रानबाजार’ ही सीरिज विशेष गाजली होती.