Prajkta Mali । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक महिलांचा, यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर आता प्राजक्ता माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार घेणार मोठा निर्णय
प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुरेश धस यांनी जे वक्तव्य केले, त्याचा तीव्र निषेध व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “दीड महिन्यांपासून मी शांतपणे ट्रोलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्सला सामोरे जात आहे. शांतता हवी होती, पण त्याच शांततेचा गैरवापर झाला. महिलांची अब्रू उडवून त्यावर चिखलफेक केली जात आहे, जेणेकरून समाज माध्यमांवर त्यांचं मनोरंजन होईल. हे खूप चुकीचं आहे.”
Dr. Manmohan Singh । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा
तसेच प्राजक्ताने म्हटलं, “मी कधीही माझ्या चारित्र्याचा खुलासा करण्याची आवश्यकता समजलो नाही. घरच्यांचा आणि सहकाऱ्यांचा विश्वास माझ्यावर होता. पण आता लोकप्रतिनिधींच्या वतीने चिखलफेक केल्याने ही वेळ येण्याची गरज वाटली.” प्राजक्ताच्या या वक्तव्यामुळे राजकारणात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
Pune Accident । पुण्यात मद्यधुंद कार चालकाचा विचित्र अपघात, ९ वाहनांना धडक; एक गंभीर जखमी