शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, संजय राऊतांचा विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Prakash Ambedkar reacts on Sanjay Raut's statement that Sharad Pawar should be respected; said…

शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजही भाजपशी संबंध आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेलं आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील आवडले नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, असा इशारा दिलाय. आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर नवीन राज्यपाल कोण? महत्वाची अपडेट आली समोर!

महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोलावं, असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला होता. याबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”जर हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी मान्य केला असता”, असा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर भाऊसाहेब शिंदेंचा येतोय नवीन चित्रपट! ग्रामीण बाज आणि वास्तव दाखवणार ‘रौंदळ’

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी, खासदार सुप्रिया सुळे, आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांचा बचाव करताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर अजूनही प्रकाश आंबेडकर यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.

के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *