Prakash Ambedkar । मागच्या काही दिवसापासून राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील (Jarange Patil) मुंबईच्या वेशीवर दाखल झाल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणासंबंधी सर्व मागण्या मान्य केल्या. मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अजून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सध्या देखील मराठा आरक्षणासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Ganpat Gaikwad । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की कुणबी संदर्भात निर्णय आम्ही घेतला आहे. मराठा समाजाचा निर्णय राज्य मागास आयोग घेणार आहे. त्यांचे वक्तव्य महत्वाचे आहे. मात्र त्यांनी काढलेला कुणबी मराठ्यांचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही. जीआर अजून फायनल झालेला नाही. या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत.
Sharad Pawar । लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अध्यादेश फायनल झाला तरी देखील कायदेशीर प्रक्रियेत जाणार आहे. कारण ओबीसींचा त्याला मोठा विरोध आहे. या प्रकरणांमध्ये ओबीसी आणि मराठा हे दोन्ही गट सहजासहजी ऐकणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.