अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात सत्ता बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार भाजपशी हातमिळवणी करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या सर्व चर्चा चालू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता फुटणार? भाजपकडून आली ऑफर! थेट मोदींनीच केले कौतुक
पुण्यामध्ये एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या १५ दिवसानंतर मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि एक नसून 2 बॉम्बस्फोट होणार असल्याच आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
राज कुंद्राचा अतरंगी अवतार पाहून नेटकरी म्हणाले, “याने तर उर्फीलाही…”
त्याचबरोबर त्यांनी यावेळी विरोधकांना देखील टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेने बरोबर वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आमच्या युतीची काळजी करू नका, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.
अजित पवारांचा निर्णय पक्का? तिथी लवकरच काढली जाईल; गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य