Site icon e लोकहित | Marathi News

Prakash Ambedkar । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार? प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar । मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा भरोसा नाही. अनेक नेते सध्या पक्षांतर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक नवा बॉम्ब टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar । शरद पवारांबाबत अजित पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “एकेकाळी मी त्यांना दैवत…”

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्याचा रोखा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेला होता का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचे आहे. असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते कराड या ठिकाणी बोलत होते.

Salman Khan । सर्वात मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या विधानानंतर आता साताऱ्यामधील काँग्रेसचा हा बडा नेता नेमका कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावर पृथ्वीराज चव्हाण काय प्रतिक्रिया देणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Shiv Sena Nashik Candidates । ब्रेकिंग! नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला, शिंदे गटाने या नेत्याला दिली उमेदवारी

Spread the love
Exit mobile version