Congress । ऐन निवडणूक (Loksabha election) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे (Prakash Devtale) यांनी भाजपमध्ये (Bjp) प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. प्रकाश देवतळे यांच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, विदर्भात तेली समाजाची संख्या खूप जास्त आहे.
Crime News । महाराष्ट्र हादरला! वाळू तस्करांच्या दोन गटात गोळीबार
असे असूनही काँग्रेसकडून एकही तेली समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे देवतळे नाराज होते अशी माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे देवतळे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत देवतळे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.