Praniti Shinde | राजकारणातून सर्वात मोठी बातमी! प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

Ram Satpute Vs Praniti Shinde

Praniti Shinde | नुकतीच भाजपने (BJP) महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने सोलापूरमधून राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण सोलापूरमधून काँग्रेसने प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

Ajit Pawar । निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसणार? शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तर राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. (Praniti Shinde vs Ram Satpute) नुकतेच प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या खूप चर्चेत आहे.

Car Accident । होळीच्या दिवशी मोठा अनर्थ घडला, कारचा भीषण रस्ता अपघात, माय-लेकींसह 3 जणांचा मृत्यू

पाहा प्रणिती शिंदे यांचे पत्र

मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे.

Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

पुढील 40 दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते, असे पत्र प्रणिती शिंदे यांनी लिहिले आहे.

Spread the love