Ram Satpute । सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने (Congress) उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केलं. त्यानंतर भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. यामुळे सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते (Praniti Shinde Vs Ram Satpute) असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या दोन्ही नेत्यांच्या नावांची घोषणा होताच दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. (Latest marathi news)
“एका सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या प्रॉपर्टीचा हिशोब मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मागील 40 वर्षांतील प्रॉपर्टीचा अगोदर हिशोब द्यावा, अशी मागणी राम सातपुते यांनी केली आहे. दरम्यान, काल रात्री आमदार सातपुते यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
Amol Kirtikar । ठाकरेंना मोठा धक्का! लोकसभा उमेदवाराला ईडीचे समन्स
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ही निवडणूक ऊस तोड कामगारांचा एक मुलगा विरूध्द माजी मुख्यमंत्र्याची मुलगी (Praniti Shinde) अशी होणार आहे. माळशिरस तालुक्यात केलेलं माझं काम पाहून सोलापूरची जनता मला निवडून देईल असा मला विश्वास आहे. प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहिर होताच जसं अभिनंदनाचे पत्र लिहिले तसंच चार जून रोजी देखील विजयाचं पत्र त्या मला लिहितील,” असा चिमटाही सातपुते यांनी काढला आहे.
Manoj Jarange Patil । निवडणुकांना लागणार वेगळं वळण! जरांगे पाटलांनी घेतली मोठी भूमिका