Aaditya Thackeray : ”आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत” आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रताप सरनाईकांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Pratap Sarnaik's reply to Aditya Thackeray's criticism, "We are not traitors, we are Khuddars", said…

मुंबई : 17 ऑगस्ट पासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलेले आहे. ‘५० खोके एकदम ओक्के, गद्दार’ अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावरूनच आता शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik) यांनी आपले मत मांडले आहे. तसेच आदित्य ठाकरे हे नेहमीच शिंदे गटात (Aaditya Thackeray) गेलेल्या नेत्यांना गद्दार म्हणत असतात आदित्य ठाकरेंच्या या गद्दार म्हणण्याला देखील त्यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे.

आमदार प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत की, राज्यात आज शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, पूरस्थिती यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या घोषणाबाजीकडे लक्ष न देता, जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. ते विरोधक असल्याने त्यांना प्रसिद्धीसाठी काहीतरी करावं लागतं. मात्र, त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता, चांगल्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले आहे. ”आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत”.

विधानभवनासमोर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलेला आहे. महाविकास आघाडी मधील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनासमोर आज ‘ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ या घोषणा करत परिसर दणाणून सोडलेला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *