Site icon e लोकहित | Marathi News

Pratibhatai Patil Health । सर्वात मोठी बातमी! देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत खालावली; रुग्णालयात उपचार सुरु

Pratibhatai Patil

Pratibhatai Patil Health । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. प्रतिभाताई पाटील लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Accident News । भीषण अपघात! भरधाव कारने १० ते १२ जणांना चिरडलं; पाहा धक्कादायक व्हिडीओ

प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष इतके आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. २००७ ते २०१२ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे. मागच्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नाही मात्र काल जास्तच असवसथ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील भारती रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Lok Sabha Election । अशोक चव्हाणांचा काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

प्रतिभाताई पाटीलया जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रपती पदावर असताना संपूर्ण जगात भारताची नवी ओळख करून दिली.

Vasant More । सर्वात मोठी बातमी! वसंत मोरे करणार भाजपमध्ये प्रवेश? ‘त्या’ फोनवरून रंगली चर्चा

Spread the love
Exit mobile version