Pravin Mane । अजित पवार की शरद पवार कोणाला पाठिंबा देणार? सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचे मोठे वक्तव्य

Pravin Mane

Pravin Mane । सध्या राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूर (Indapur) आणि तेथील परिसरात जनाधार असणाऱ्या सोनाई डेअरीच्या (Sonai Dairy) प्रवीण माने यांचा पाठिंबा नेमका कोणाला? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत प्रवीण माने यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंना बारामतीत सर्वात मोठा धक्का!

आपण अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे प्रवीण माने यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आज पत्रकार परिषद (Press conference) बोलवण्याचं कारण म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये (Baramati Lok Sabha Constituency) धुमसचक्री सुरू आहे. पवार कुटुंबीयांसोबत माने कुटुंब नेहमीच राहिल आहे. त्यामुळे आता अजित पवार यांचे हात बळकट करून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अजित पवारांसोबत आहोत असे देखील प्रवीण माने म्हणाले आहेत.

Loksabha Election 2024। ब्रेकिंग! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का! भाजप त्या यादीतून नावे काढून टाकणार

राज्याचा विकास व्हावा यासाठी अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आज पासूनच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. सुनेत्रा वहिनी यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे देखील वक्तव्य प्रवीण माने यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना बसणार सर्वात मोठा फटका!

Spread the love