
नवी दिल्ली : बरेच तरुण शिक्षण पूर्ण करून देखील बेरोजगार आहेत. भारतामध्ये नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. आता बेरोजगारांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशामध्ये हजोरा नोकऱ्यांची घोषणा करत रोजगार शोधत असलेल्यांची दिवाळी (Diwali) गोड केली आहे.
व्हॉट्सअॅप नक्की बंद पडलं की हॅक झालं? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय करणार सखोल तपास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मंत्रालय आणि सरकारी खात्यामध्ये एकूण 75 हजार जागा भरण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेमुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यानुसार पोस्ट विभाग, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय या विभागामध्ये वेगेवेगळ्या पदांसाठी नोकऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत.
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कुसुम सोलर पंप, ‘असा’ करा अर्ज
त्याचबरोबर गट अ, गट ब (राजपत्रित) गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क या तिन्ही गटांमध्ये देखील भरती होणार आहे. यामध्ये वेगेवेगळ्या पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीएससी बोर्ड, एएसी, मंत्रालय, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्ड यासंस्थांमार्फत पदभरती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास