दिल्ली : आज नवी दिल्लीतील (New Delhi) प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या (Congress) सहाव्या सत्राचे उद्घाटन होते. दरम्यान हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही (5G service) शुभारंभ केला. या 5G सेवेचा नागरिकांना आनंद घेता येणार असून त्यांची 5G ची प्रतिक्षा संपली आहे.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एअरटेल, जीओ सारख्या कंपन्यांनी 5G चे प्रात्याक्षिक दाखवले. तेव्हा त्यांनी ‘जिओ-ग्लास’सह इतर 5G उपकरणांची पाहणी करून एंड-टू-एंडचे स्वदेशी तंत्रज्ञानही समजून घेतले. आता सर्वप्रथम देशातील काही निवडक मेट्रो शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामुळे नागरीकांना 4G पेक्षा दहापट वेगाने इंटरनेटचा वेग अनुभवता येईल.
मुलींना मांडीवर बसवून शिक्षक करायचा ‘हे’ काम, पालकांनी चप्पलचा हार घालत संपूर्ण गावात काढली धिंड
प्रथम या 13 शहरांना मिळणार 5G सेवा
देशातील निवडक 13 मेट्रो शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध झाली असून यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, दिल्ली आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट
5Gचे ‘हे’ असतील फायदे
5Gमुळे ग्राहकांना इंटरनेट स्पीड दहा पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही आता दूर होतील. 2-3 GBचे चित्रपट आता कमी वेळात डाऊनलोड होणार. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. महत्वाचं म्हणजे गेमिंग जग बदलेल. विशेष म्हणजे दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करणे सोपे होणार असून Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.
Rashmika-Vijay: विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर रश्मीकाने सोडलं मौन; म्हणाली…