Narendra Modi । राज्यात अवघ्या काही दिवसांवर निवडणुका (Loksabha election 2024) येऊन ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आपापल्या मतदासंघात सभा घेत आहेत. निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! विदर्भातील बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश
चार वर्षांपूर्वी कोरोनाने (Covid-19) संपूर्ण जगात खूप थैमान घातले होते. अनेक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला. यात लहानांपासून ते वयोवृद्धांचा समावेश होता. कोरोनामुळे (Corona virus) अनेकांचे व्यवसाय बुडले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील सर्व नागरिकांना थाळी आणि टाळ्या वाजवण्यास सांगितलं होतं. पण अजूनही यामागचे कारण अनेकांना माहिती नाही.
नुकताच मोदींनी प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात थाळी आणि टाळ्या वाजवण्यामागचे कारण सांगितले आहे. “टाळ्या, थाळी, दिव्यांवरून आजही देशात मस्करी केली जात आहे. पण मला त्यावेळी जनतेला विश्वासात घ्यायचं होतं की आपल्याला ही लढाई एकत्र लढायची आहे. त्यावेळी असा विश्वास निर्माण झाला की आपल्याला आपलं आयुष्य वाचवताना इतरांचं आयुष्य वाचेल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग ती एक प्रकारे व्यापक चळवळ झाली. त्यामुळे नंतर मी देशवासीयांना जे काही सांगायचो, त्याचा स्वीकार व्हायचा,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
Crime News । महाराष्ट्र हादरला! वाळू तस्करांच्या दोन गटात गोळीबार