गेल्या काही वर्षांपासून ‘समृद्धी महामार्ग’ ( Samruddhi Mega Highway) हा राजकीय वर्तुळातील एक चर्चेचा मुद्दा होता. या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा लवकरच पार पडणार आहे. 11 डिसेंबर रोजी नागपूर येथे हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्तेच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.
ऊस उत्पादकांसाठी खूशखबर! अखेर राज्यसरकारने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला
इतकेच नाही तर, नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील यावेळी उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्घाटन सोहळ्या अगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिले आहे.
बिग ब्रेकिंग! रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम
पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपुरात ( Nagpur) येणार होते. याचवेळी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होईल असे म्हंटले जात होते. परंतु, 11 डिसेंबरला उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी होकार दर्शवला आहे.
बिग ब्रेकिंग! ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले याचे निधन
या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नागपुरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो ते नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती महा मेट्रोच्या सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश