आधार कार्ड हे सध्याच्या काळातील महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँक व्यवहारापासून ते शाळेच्या प्रवेशापर्यंत सगळीकडे आधारकार्ड ओळखपत्र म्हणून दाखवावे लागते. दरम्यान, मोदी सरकारने आधारकार्ड संबंधित एक मोठी भेट सामान्य लोकांना दिली आहे. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आतापर्यंत पैसे मोजावे लागत होते. मात्र पुढील तीन महिने कोणत्याही शुल्काशिवाय आधारकार्ड ( Aadhar Card) अपडेट करून मिळणार आहे.
बजरंग दलाने रॅपर एमसी स्टॅनचा कार्यक्रम केला बंद; पाहा VIDEO
महत्त्वाची बाब म्हणजे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आधी 50 रुपये खर्च येत होता. मात्र मोदी सरकारच्या नवीन निर्णयामुळे पुढील तीन महिने हे काम फुकट होणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन तुमचे आधारकार्ड अपडेट करू शकता. 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 या काळातच निशुल्क आधारकार्ड अपडेट करण्यात येणार आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
त्याच झालंय अस की, आधारकार्ड काढून आता लोकांना जवळपास 10 वर्षे झाली आहेत. मात्र या काळात अनेक लोकांची माहिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर UIDAI ने हा निर्णय घेतला आहे. यासाठी मोदी सरकारने सहकार्य केले आहे. तसेच आधारकार्ड अपडेट करण्याचा ऑनलाइन वेग वाढवा यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले आहेत.
भीषण अपघात! तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
आधारकार्ड अपडेट करण्याच्या सोप्प्या स्टेप्स
1) My Aadhar पोर्टल वर जाऊन update your Address online वर क्लिक करावे.
2) यानंतर तुम्हाला proceed to update चा पर्याय दिसेल.
3) यामध्ये एक विंडो उघडेल ज्यामध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाकून send otp करावे लागेल.
4) रजिस्टर्ड नंबर वर आलेला ओटीपी व्हेरिफिकेशन करेल.
5) यानंतर पत्त्याचा पुरावा जोडून सबमिट करावा लागेल.
“तो वाढदिवसाचा केक कापणारचं होता तेवढ्यात घडलं असं की…”, पाहा व्हायरल VIDEO