दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह (maharashtra) 11राज्यामध्ये लंपी रोगाने (Lumpy disease) थैमान घातले आहे.या रोगामुळे अनेक जनावरे (animals) मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या रोगावर आता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. तसेच या लसीकरणाबरोबरच जनावरांच्या तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावरून लम्पी हा आजार अटोक्यात आणला जाईल. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागांची होणार भरती, असा करा अर्ज
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत आहे. राजस्थानमध्ये जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. दरम्यान या रोगाला घेऊन आता काही लोकांनी अफवाही पसरवल्या आहेत.लंपी रोग जनावरांना होतोय आणि जनावरांच्या दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. यामुळे लोकांसमोर दूध प्यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच अफवेला राजस्थान राज्य बळी पडताना दिसले आहे.