मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट (sairat movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की या चित्रपटाची चर्चा सगळ्यांच्याच तोंडात होती. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. सैराट या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर (Aakash Thosar) आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांच्यासोबतच प्रिन्स ही भूमिकाही गाजली. दरम्यान या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सूरज पवार (Suraj pawar) म्हणजेच चित्रपटातील प्रिन्स दादा (Prince) हा अडचणीत सापडला आहे.
शरीरावर सुज येतेय? मग करा हे घरगुती उपाय, झटपट होईल सुज कमी
घडल अस की, सूरजवर शिर्डीतील एका व्यक्तीला मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन फसवल्याचा आणि पैसे उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी अभिनेता सूरज पवारच्या देखील मुसक्या आवळण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय सांगता? आता शेतमाल सुद्धा मिळणार ॲमेझॉनवर; ॲग्रिकल्चरल ट्रस्ट आणि ॲमेझॉनमध्ये सामंजस्य करार
नेमक प्रकरण काय आहे ?
नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना दोन जणांनी मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दिलं होतं. दरम्यान नोकरीसाठी वाघडकर यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. यामध्ये नोकरी लागल्यावर तीन लाख द्यायचे आणि सुरुवातीला २ लाख द्यायचे अशी त्यांची बोलणी झाली होती. दरम्यान महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले असता त्यांना आपली फसवणूक होत असल्याची समजले. पुढे त्यांनी या घटनेबाबत रितसर अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली.
State Govt: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसान भरपाईची रक्कम येणार थेट बँक खात्यात
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर ( रा.नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर ) अशा तीन जणाांना अटक केली आहे. दरम्यान महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणी सैराट फेम अभिनेता सूरज पवार याचाही सहभाग असल्याचे बोललं जात आहे. तपासानंतर सूरज पवार याला देखील अटक होण्याची शक्यता आहे.