शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे आदर्श असतात. आपला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षक कायम प्रयत्नशील असतात. दरम्यान बिजेपुर (Bijepur) गावातील सरकारी शाळेतील मुख्यध्यापक सध्या चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरले आहेत. या शाळेतील मुख्यध्यपकांनी आपल्या स्वतःच्या पैशातून शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवास करून दिला आहे.
बिग ब्रेकिंग! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उतरणार मैदानात
बिजेपुर गावात असणाऱ्या सरकारी शाळेतील इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला नेण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाचा आनंद घेतला. ट्रेन मध्ये देखील कधीही न बसलेल्या विद्यार्थ्यांना या सहलीमुळे (School Trip) विमानातून प्रवास करता आला.
ऊस वाहतूकदारांसाठी चक्काजाम आंदोलन होणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
या सहलीला जणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, ” आम्ही खेळाच्या मैदानावर असताना आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहायचो. तेव्हा विमान फार छोटे दिसायचे, मात्र ते जमिनीवर खुप मोठे दिसते. विमान प्रवासात आम्हाला खुप मजा आली.”
अबब! गायीने दिला चक्क चार वासरांना जन्म; वाचा सविस्तर बातमी
शाळेचे मुख्याध्यापक किशोर कणसे यांनी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी स्वतःच्या बचतीमधून 60 हजार रुपये खर्च केले आहेत. शाळेतील मुलांनी कधीच विमानात बसण्याची कल्पना देखील केली न्हवती. त्यामुळे या मुलांना विमान प्रवास करायला मिळावा अशी मुख्याध्यापक किशोर कणसे यांची इच्छा होती.