
कारागृहातील कैद्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कारागृहात आता 50 पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना बेड आणि उशी मिळणार आहे. कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी हा निर्णय घेतला आहे.
सपना गिलने केले पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला…”
या निर्णयानुसार, इथून पुढे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन कैद्यांना साधारणतः जाड अंथरून व उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वयातील काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. या बाबींचा सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कैद्यांना बेड आणि उशी देण्याच्या परवानगीबाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख आणि सर्व कारागृह अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे.
“तोपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत…”, एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम
हा निर्णय घेण्यात आला असला तरी यासाठी तुरुंग ( Jail) प्रशासनाने काही निकष ठरवले आहेत. यामध्ये बेडची उंची व रुंदीबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच कैद्यांचा तणाव दूर करण्यासाठी त्यांना आपल्या नातेवाईकांशी महिन्यातून तीन वेळा दूरध्वनीवर प्रत्येकी दहा मिनिटे बोलता येणार आहे. इतकंच नाही तर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्य सरकारच्या ( State Government) माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“तोपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत…”, एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम