Prithviraj Chavan । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निवडणुकीच्या तारखा (Loksabha election) जाहीर करताच महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काही जागांवर तिढा सुटत नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी त्या ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. अशातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वात मोठे विधान केले आहे. (Latest marathi news)
मागील काही दिवसांपासून साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण उभे राहणार असल्याच्या जोरदार चर्चा असून याबाबत आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “साताऱ्यातून माझ्या नावाची चर्चा सुरू नाही कारण ही जागा फक्त शरद पवार गटाची (Sharad Pawar Group) आहे. माध्यमांनी माझं नाव घेतलं असून जर शरद पवार यांनी आदेश दिला तर मी साताऱ्यातून निवडणूक लढेल,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
साताऱ्याच्या जागेबाबतचा निर्णय शरद पवार यांचा आहे. पण मला खात्री आहे की, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाही, सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे हे शरद पवार ठरवतील. शरद पवारांचा निर्णय सर्वमान्य असेल. हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे असून येथील उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीने काम करायची आमची तयारी आहे,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
Arvind Kejriwal News । ब्रेकिंग! न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत तुरुंगात पाठवले