प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कामे केली आहेत. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करत चित्रपटसृष्टीमधील शुटिंगदरम्यानचे मोठमोठे खुलासे देखील करते. प्रियांका चोप्राने सध्या एका मुलाखतीमध्ये तिच्या दिग्दर्शकाविषयी मोठा खुलासा देखील केला आहे. प्रियांका चोप्राला दिग्दर्शकला इनरवेअरमध्ये पाहायचे आहे. असा खुलासा प्रियांका चोप्राने एका मुलाखती दरम्यान केला आहे.
प्रियांका चोप्राने 2002- 03 दरम्यान तिच्या आयुष्यातील घडलेल्या एका घटनेबद्दल खुलासा केला. यावेळी ती एका चित्रपटामध्ये
अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारत होती. प्रियांका चोप्रा म्हणाली हा माझ्या आयुष्यातील अतिशय अमानवी क्षण ( Inhuman moment ) असल्याने मी या चित्रपटापासून दूर जाण्याचा विचार करत होते. या शूटिंग दरम्यान मला एक एक करून माझे कपडे काढून पुन्हा कपडे घालायचे होते.
प्रियांका चोप्राचा दिग्दर्शक प्रियांकाला म्हणाला, मला तुला अंडरवेअरमध्ये पहायचे आहे. यावेळी प्रियांका म्हणाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग होता. व जे माझ्यामध्ये अभिनयाचे कौशल्य आहे त्याचा काहीदेखील उपयोग नाही असे मला वाटू लागले. त्यानंतर प्रियांका चोप्राने दोन दिवस काम करून तो चित्रपट सोडून दिला.
पत्नीने पतीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, अन्… व्हिडीओ पाहून बसेल धक्का