सेलिब्रिटींच्या बाबत लोकांमध्ये कायम उत्सुकता असते. यामुळे त्यांच्याबाबतच्या सगळ्या गोष्टींवर प्रसारमाध्यमे लक्ष ठेऊन असतात. मागील काही दिवसांमध्ये अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आईबाबा झाले आहेत. मात्र त्यांनी कटाक्षाने आपल्या मुलांना लाइमलाईट पासून दूर ठेवले आहे. यामध्येच एक म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बरेच दिवस प्रियंकाने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र आता तिच्या लेकीचा चेहरा दिसत असलेला पहिला फोटो समोर आला आहे.
Pakistan mosque blast: ६३ पोलिसांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिकजण जखमी तर ४७ लोकांची प्रकृती गंभीर
नुकतीच प्रियंकाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमामध्ये जोनस ब्रदर्स, निक जोनस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी प्रियांका ही मालतीला हातात घेऊन पहिल्या रांगेत बसलेली दिसत आहे. याचा एक व्हिडीओ देखील प्रियांकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
भारत जोडो यात्रेने काँग्रेसचे चित्र पालटले! लोकसभेत भाजपसमोर आव्हान उभे राहणार का?
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की ‘खूप क्युट बेबी आहे’. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘निक जोनस सारखी दिसत आहे’. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.
म्हणून आलिया, अनुष्का आणि सोनम दाखवत नाहीत त्यांचा बाळांचा चेहरा; वाचा सविस्तर