Site icon e लोकहित | Marathi News

ऊसाचे पाचट न जाळता तयार करा सेंद्रिय खत; ‘असा’ होतो फायदा

Produce organic fertilizer without burning sugarcane bagasse; This is the benefit

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने नुकतेच काही मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यातील बहुतेक कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड झाल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात पाचट उरते. हे पाचट जाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

थेट जर्मनीहून कांदे लावण्यासाठी महिला आली भारतात; पाहा VIDEO

परंतु, पाचट जाळण्यापेक्षा त्याचे सेंद्रिय खत केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. उसापासून (Sugarcan) दर हेक्टरी 7 ते 8 टन पाचट तयार होते. यापासून सेंद्रिय खत तयार केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. खरंतर ऊसाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. आजकाल रासायनिक खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. तसेच पाचट जाळल्याने जमिनीतील वरच्या थरातील उपयुक्त जिवाणू व अन्नघटकांचा नाश होतो. यामुळे शेतकऱ्यांनी पाचटीपासून सेंद्रिय खत तयार केल्यास त्यांना मदत होऊ शकते.

शिंदे सरकारनं ऊस उत्पादकांना दिली मोठी खुशखबर

पाचटीपासून सेंद्रिय खत ( Natural Fertilizer) बनवण्याची पद्धत

1) खोडव्या ऊसाच्या सरीनुसार शेतातील पाचट समप्रमाणात पसरून घ्या.
2) एकरी 1 बॅग युरिया व 1 बॅग सुपर फॉस्फेट 10 टन उसाची मळी व शेवटी 4 किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरून घ्यावेत.
3) खोडव्याच्या बाजूला फोडून पाचटीवर माती पसरावी
4) पाचट उघडी पडू नये याची काळजी घ्यावी. व नेहमीच्या पद्धतीने पाणी द्यावे.

नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला

Spread the love
Exit mobile version