बारामती : तुळजाराम चरतुरचंद महाविद्यालयातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागामार्फत निर्भया दिनानिमित्त काल (दि.20) महिला सशक्तीकरणावर ( Women Empowerment) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य व लघु नाटिकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बारामती निर्भया पथकाच्या प्रमुख अमृता भोईटे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून ‘बलात्कार’ या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच स्त्रीभ्रूण हत्या, घरगुती अत्याचार, सायबर क्राईम, हुंडाबळी, ऍसिड हल्ले व वैवाहिक बलात्कार या विषयांवर आधारीत नाटिका सादर केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटिकांदरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणारे कायदे व नियम याबद्दल देखील उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
इंदुरीकर महाराजांच्या घरी गुलाल ! कुटुंबातील ‘ही ‘ व्यक्ती झाली सरपंच
सीक्रेट बॉक्सचे विशेष आकर्षण
खास महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘Unlock The Untold Stories’ या उपक्रमाचे विशेष आकर्षण होते. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी कुणालाच न सांगण्यासारखा एखादा प्रसंग, अडचण किंवा दुःख असतेच. त्यामुळे मानसिक रित्या होणारा त्रास देखील भयंकर असतो. यासाठी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी महाविद्यालयात ठीकठिकाणी सीक्रेट बॉक्स ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तेजस्विनी पंडितचा मोठा खुलासा; थेट नगरसेवकानेच दिली ‘ही’ ऑफर