आजपासून मांढरदेव ( वाई ) येथे काळूबाई देवीची ( Kalubai Temple) यात्रा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यात्रा सुरळीत पार पाडली जावी यासाठी 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात मांढरदेव ( Mandhardev) परिसरात प्रतिबंध असणार आहेत
पुणे जिल्ह्यात लम्पीच्या लसींचे उत्पादन होणार; देशात सर्वप्रथम पुण्यालाच मिळाली संधी!.
प्रतिबंधात्मक बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये मनाई करण्यात आलेल्या बाबी
1) यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे.
2) कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. प्राण्यांना वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास व त्यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.
3) या परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे.
4) मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे.
5) मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे आणि तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे.
6) परिसरात दारु, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
पुणे जिल्ह्यात लम्पीच्या लसींचे उत्पादन होणार; देशात सर्वप्रथम पुण्यालाच मिळाली संधी!
वरील आदेशांचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मांढरदेव परिसराची पाहणी करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा राडा; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना झाली कैद