
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत टीका केली आहे. याआधी देखील खूपदा त्यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. परंतु, यावेळी अगदी मर्यादा सोडून टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाला आहे. याच पार्शवभूमीवर त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री घनश्याम शेलार यांचे नेतृत्वाखाली श्रीगोंदा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
मोठी बातमी! कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत भीषण आग
हे आंदोलन श्रीगोंद्यातील शनी चौक या ठिकाणी करण्यात आले. या आंदोलनात उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला. त्याचबरोबर सत्तारांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी चौकात घोषणा दिल्या.
तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे व त्याचबरोबर पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठी बातमी! वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती