मागच्या दहा दिवसापासून राज्यामध्ये मराठा आंदोलन चांगलेच चर्चेत आहे. जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आंदोलन चांगलेच पेटले आहे. दररोज कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचे आंदोलन सुरूच आहे. अनेक ठिकाणी जालन्यातील घटनेचा देखील निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत तर काही ठिकाणी जाळपोदेखील केले जात आहेत. अनेक ठिकाणी सरकारी बस पेटवून दिल्याच्या देखील घटना घडल्या आहेत तर काहीजणांनी आंदोलन देखील सुरू केल आहे.
Health Tips । सावधान! चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका फ्रीजमध्ये, द्याल कॅन्सरला आमंत्रण
जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जिल्हे, तालुके तसेच खेड्यापाड्यातील गावे देखील बंद पुकारण्यात आले आहेत. मराठा आंदोलन पेटलेले असतानाच आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Crime News । ब्रेकिंग! सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी मोठी अपडेट, १२०० पानांचे दोषारोपत्र दाखल
या घटनेचे अनेक पडसाद उमटायला आता सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर धनगर समाज देखील आरक्षणासाठी आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या आंदोलकांनी तर थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले असून राज्याचे वातावरण देखील तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Asia Cup 2023 । पावसामुळे आशिया चषकाची फायनल रद्द झाली तर विजेता कोण? काय सांगतो नियम जाणून घ्या…